माढा : बार्शी माढा ही बार्शी आगाराची बस माढा बस स्थानकात दोन तास उशिरा आल्याने माढ्यातून वडशिंगे येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्शी आगाराच्या ढिसाळ व्यवस्थापनेचा फटका बसून त्यांना ऐन थंडीच्या काळात माढा बस स्थानकावर दोन तास उपाशीपोटी ताटकळत बसावे लागले आहे. माढा शहरात वडशिंगे गावातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून ४.४५ वाजता शाळा सुटल्यानंतर त्यांना परत जाण्यासाठी माढा बार्शी ही साडेपाच वाजता ची गाडी आहे. परंतु ती नेहमीच कधी वेळेवर तर कधी अवेळी येते त्यामुळे वडशिंगे गावच्या विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
या गाडीने शुक्रवारी मात्र विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय केली. ५.३० वाजता येणारी गाडी थेट ७.५ वाजता माढा बस स्थानकावर आल्याने पाचवी ते आठवीच्या लहान विद्यार्थ्यांन सह त्या मार्गावरील प्रवाशांना कडाक्याच्या थंडीच्या काळात दोन तास उपाशा पोटी कुडकुडत बसची वाट बघत बसावे लागले. या गोष्टीचा बार्शी आगाराच्या व्यवस्थापनकांनी विचार करून येथून पुढे तरी विद्यार्थ्यांचा विचार करून वेळेत बस येण्याचे नियोजन करावे ही मापक अपेक्षा पालक व प्रवाशांन मधून व्यक्त केली जात आहे.
बार्शी गाडी वेळेत न आल्याने माढ्यातील प्रभारी बस व्यवस्थापक महेश गवळी हे एसटी येऊ पर्यंत बस स्थानकात थांबले होते. त्यांनी बस आल्यानंतर विद्यार्थ्यांना बस मध्ये बसवून दिले तसेच पालकांना फोनवरून याची माहिती दिली.
भ्रमणध्वनी वरून बार्शी कंट्रोलला याचे विचारणा केली असता माढा येथे ५.३० येणारी गाडी आज रद्द केली आहे असल्याचे त्यांनी सांगितले पण त्यांना कशामुळे गाडी रद्द केली आहे याचे कारण सांगता आले नाही. यातूनच बार्शी आगाराचा ढिसाळ कारभार समोर येत आहे.
काल माढा बार्शी ही बस दोन तास उशिरा आल्याने विद्यार्थी व प्रवाशांना त्यांचा त्रास झाला मी यासंदर्भात बार्शी आगारा व्यवस्थापनाला फोन करून या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी यापुढे अशी बस उशिरा येणार नाही. शुक्रवारी बस का उशिरा गेली या संदर्भात माहिती घेतो असे सांगितले.
माझी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी होती माझ्या बदल्यात प्रभारी म्हणून महेश गवळी हे येथे कर्तव्यात होते. त्यांनी स्वतः थांबून गाडी आल्यानंतर विद्यार्थ्यांना गाडीत बसून दिले.

























