मुदखेड ता प्र
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व तालुकाध्यक्षांनी कोणत्याही प्रश्र्नांसाठी पुढाकार घ्यावे मी आपला भाऊ म्हणून कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभा राहणार असे मत खासदार वसंतराव चव्हाण यांनी आ. बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त नायगांव येथे आयोजित कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले
प्रहार संघटनेचे नेते आ.बच्चु कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका नायगांव मुदखेड शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मा.खासदार वसंतराव चव्हाण तर माधवराव बेळगे पंकज पा.चव्हाण जिल्हा प्रमुख विठ्ठलरावजी देशमुख जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर गणेश पा.हांडे हवगिराव पाटील विजय हनमंते शिवलिंग माटोरे संतोष पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती .
या कार्यक्रमात योगायोग प्रहार संघटनेचे मुदखेड तालुकाध्यक्ष अनिल पा.शेटे साईनाथ बोईनवाड गोविंद लोणे यांच्यासह सदर संघटनेच्या वतीने खासदार वसंतराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
मा.आमदार बच्चु भाऊ कडू यांचा वाढदिवस नांदेड जिल्ह्याच्या वतीने नायगांव येथे नांदेड जिल्ह्याचे मा.खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
तसेच प्रहार तालुका अध्यक्ष अनिल पा.शेटे साईनाथ बोईनवाड गोविंद लोणे यांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित सर्व नांदेड जिल्ह्यातील प्रहार पदाधिकारी तालुका पदाधिकारी व सर्व दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मारोती मंगरूळे यांनी केले.