मुंबई येथील सिल्वर ओक येथे शरदचंद्र पवार यांची आशाताई शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट
लोहा
शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी 3 ऑगस्ट रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे सदिच्छा भेट घेतली, यावेळी शरदचंद्र पवार व आशाताई शिंदे यांच्यामध्ये लोहा कंधार मतदार संघातील विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथे त्यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्याने मतदारसंघात चर्चा वारे वाहत आहेत यावेळी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.