सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठची खेळाडू कुमारी तनिष्का ठोकळ हिने सिंगापूर येथे झालेल्या ज्यू आशिया कप स्टेज 2 स्पर्धेत खेळताना भारतीय संघाला रौप्य पदक प्राप्त केले तसेच ओव्हर ऑल स्कोअरिंग मध्ये जागतिक स्तरावर नवीन रेकॉर्ड तयार केला.. त्याबद्दल पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी एक लाख 70 हजार रुपयाची प्रोत्साहनपर मदत व्यवस्थापन परिषदेच्या ठरावाच्या अधीन राहून विद्यापीठाने केली. तिने केलेल्या या कामगिरीबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर, प्रो कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा,सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा सचिन गायकवाड, विद्यापीठाचे क्रीडा संचालक व प्र कुलसचिव डॉ अतुल लकडे यांच्यासह सर्व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन व सहकार्य केले.
यापूर्वी तिने छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असताना शालेय स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावरती सलग दोन वर्षे विविध पथकांच्या माध्यमातून यश मिळविले तसेच खेलो इंडिया स्पर्धेसाठी ही तिने सहभाग नोंदविला, सध्या ती वालचंद महाविद्यालय सोलापूर येथे बीएससी चे शिक्षण घेत असून शिक्षणाबरोबर मैदानावरती सातत्याने सराव करून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी करत आहे.
तिच्या या यशाबद्दल मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे सचिव प्रा महेश माने यांनीही विशेष अभिनंदन केले.
————
फोटो ओळी
सिंगापूर येथे झालेल्या जूनियर आशियाई आर्चरी स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त तनिष्का ठोकळ चा सन्मान करताना कुलगुरू डॉ प्रकाश महानवर, प्रो कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा , सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा सचिन गायकवाड, कोच श्री दीपक चिकणे, पालक सौ ठोकळ
























