सोलापूर – महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना दिनांक 15 ते 18 डिसेंबर दरम्यान सकाळी 11 ते ५ या वेळेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना शहर जिल्हा संपर्क कार्यालयात अर्ज घेऊन भरता येणार आहे. जे उमेदवार शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छितात त्यांनी अर्ज भरावा असे आवाहन जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
सर्व प्रभागातून 102 उमेदवारांकडून आम्ही अर्ज भरून घेणार आहोत. परंतु आमचा आग्रह हा महायुतीचाच असणार आहे. विधानसभेदरम्यान भाजपला 25 जागा मागितल्या होत्या त्यांनी त्यावेळेस ते मान्य केले होते त्यामुळे आम्ही आमचे बेस्ट 25 उमेदवार निवडणार आहोत. शिवसेनेचे कमिटी करू आणि त्यामधून बेस्ट 25 उमेदवार छाननी करणार आहोत, त्यानंतर महायुती नाही झाली तर आमचे 102 उमेदवार तयार असतील.
यावेळी जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख सचिन चव्हाण, उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे, तुकाराम मस्के, सागर शितोळे, अश्विनी भोसले, मनीषा नलावडे, सुनंदा साळुंखे, जयश्री पवार, पूजा चव्हाण, माधुरी कांबळे, सुनंदा साळुंखे आदी उपस्थित होते.
पाण्यासाठी श्रेयवादाची लढाई कोणीही करू नये
पाण्यासाठी चा डिस्ट्रीब्यूशन लाईन साठीचा आराखडा मंजूर झालेला आहे. तिन्ही पक्ष सांगणार आहेत की हे काम आम्ही केले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केल्यामुळेच हे काम झाले आहे. कोणीही एकटा म्हणू शकत नाही की हे काम आमच्यामुळे झाले. श्रेय वादाची लढाई कोणीही करू नये, हे सरकार युतीचे आहे. आता माझ्यामुळे तुझ्यामुळे झालं म्हणण्यापेक्षा सोलापूरकरांना कसे पाणी देऊ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

























