मंद्रूप – येथील न्यू गोल्डन क्लबच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिसरातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांनी केले.
मंद्रूप व परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी न्यू गोल्डन क्लब गेल्या सतरा वर्षांपासून सातत्याने कार्यरत असून हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी युवराज राठोड, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, ग्रामसेविका सुजाता व्हनकडे, प्रा. डॉ. कैलास कसबे, विश्वनाथ हिरेमठ, मोहम्मद अलकमा, शिवपुत्र जोडमोटे, सुरेश टेळे, शिवानंद लोभे, यासीन मकानदार, उमाशंकर रावत, श्रीधर टेळे, भागण्णा अटकर, मोतीराम चव्हाण, पिरसाब हवालदार, दानेश शेख, मल्लीनाथ घाले, संतोष बरूरे, प्रवीण कुंभार, शिवराज मुगळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबलू शेख यांनी केले, सूत्रसंचालन बिलाल शेख यांनी केले, तर आरिफ नदाफ यांनी आभार मानले.
























