सांगोला – गतवेळी पार पडलेल्या सांगोला नगरपरिषद निवडणुकीत सांगोला शहरातील सर्वात मोठा पक्ष किंवा गट म्हणून दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाला यश मिळाले होते. त्यांच्या विचारांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे दिपकआबा साळुंखे पाटील आघाडीबाबत कोणती भूमिका घेतात यावर नगरपालिका निवडणुकीची समीकरणे अवलंबून असणार आहेत. त्यामुळे दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सांगोला शहर आणि परिसरातील अनेक वर्षे सोबत काम करणारे ज्येष्ठ सहकारी, नगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि विचार विनिमय करून नगरपालिका निवडणुकीबाबत पुढील दिशा ठरवणार तसेच युती आणि आघाडी बाबतचा निर्णय घेणार असे प्रतिपादन माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
सांगोला शहर व परिसरातील प्रभागनिहाय इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करू आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्याप्रमाणे त्यांच्या भावनेचा आदर करूनच सांगोला नगरपालिका निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत किंवा नेत्यासोबत युती आघाडी करायची याचा निर्णय घेऊ
– माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील


















