तभा फ्लॅश न्यूज/ नायगांव : सहशिक्षक आणि कुशल रांगोळी कार शिवाजी पेटेकर यांनी अत्यंत आकर्षक व देखणी रांगोळी साकारली आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग, जसे की बाललीला, गोवर्धन पूजा,रासलीला, इत्यादी दृश्ये त्यांनी कुशलतेने रेखाटली असून,रंगसंगती व बारकाव्यांनी सजवलेल्या या रांगोळीने खतगांवसह अन्य परिसरा तील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ग्रामीण भागातील रांगोळीकार शिवाजी पेटेकरांनी गेल्या अनेक वर्षापासून हिंदू धर्मातील प्रत्येक सण, उत्सवांना केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक सौंदर्यांने सातत्याने सजवण्याचे कार्य करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या ही गोकुळाष्टमी निमित्त त्यांनी पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारी रांगोळी साकारून, ग्रामीण भागात आपल्याकलेचा अनोखा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या रचनात्मकतेचे गावातील नागरिक, विद्यार्थ्यांसह रसिकांकडून ही भरभरून कौतुक होत आहे.
रांगोळी कार शिवाजी पेटेकर यांच्या सारखे कला प्रेमीगावात असल्यामुळे,भारतीय संस्कृतीच्या पंरपंरे नुसार राज्यात साजरे केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणाला एक सांस्कृतिक चैतन्य लाभते हे निश्चितच!