माळशिरस – पशुसंवर्धन विभाग अंतर्गत जिल्हा परिषद सेस मधून विविध योजना सुरु करण्यात आल्या असून या वैयक्तिक योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ प्रवीण शिंदे यांनी केले आहे.
पशुसंवर्धन विभाग अंतर्गत जिल्हा परिषद सेस सन २०२५-२०२६ साठी जिल्हा वार्षिक योजना २०२५-२०२६ या वर्षासाठी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर ४ शेळ्या व १ बोकड गट वाटप करणे,५० टक्के अनुदानावर पशुपालकांना मिल्किंग मशीन पुरवणे या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी खालील कागदपत्र आवशक आहेत..
फोटो ओळखपत्र,अपंग प्रमाणपत्र (लागू असल्यास),दारिद्र्य रेषेचा दाखला (लागू असल्यास),७/१२ व ८ अ उतारा ,ग्रामपंचायत नमुना ८ ,जातीचा दाखला (लागू असल्यास),रेशन कार्ड ,अपत्य दाखला,बचत गट प्रमाणपत्र (लागू असल्यास),रोजगार कार्ड (लागू असल्यास),प्रशिक्षण (गोपालन वा शेळी पालन )(लागू असल्यास )या कागदपत्रासह सदर योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने दि ०५/०१/२०२६ ते २४/०१/२०२६ पर्यंत पंचायत समिती माळशिरस पशुधन विभागात जमा करावेत.
























