Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार आयुष्य सुगंधीत करणारा सर्वोच्च पुरस्कार – विवेक घळसासी!

तरुण भारतbyतरुण भारत
February 18, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 पंढरपूर – कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार म्हणजे आपल्या मातीतील आयुष्य सुगंधीत करणारा सर्वोच्च पुरस्कार असे प्रतिपादन  ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांनी केले.

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून, दक्षिण काशी म्हणून जसे प्रसिद्ध आहे, तसेच या पंढरीला कलेचा वारसा देखील दैदिप्यमान लाभलेला आहे. अनेक शतकांची ही पुण्यभूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तसेच अनेक दिग्गज कलाकार देखील या भूवैकुंठात जन्म घेतलेले आहेत. साहित्य, कला, संगीत व नाट्य या विविध क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कलासाधना जोपासली आहे. अशा कलाकारांना गेली १८ वर्ष हा पुरस्कार ही संस्था  देत असते. 

कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पंढरी कलारत्न व विशेष गुणवत्ता पुरस्काराचे वितरण कर्मयोगी सभागृह पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली, दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या हस्ते संपन्न झाला. 

यावेळी संस्थेच्या वतीने पंढरी कलारत्न हा पुरस्कार यावर्षी पंढरीचे सुपुत्र व सध्या नागपूरस्थित असलेले , ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी  यांना “पंढरी कलारत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना घळसासी पुढे म्हणाले की,  कलासाधनाचे हे कार्य अखंडीतपणे सुरु ठेवा, लहान मुलांना जातीभेद, वर्णभेद, यापासून पालकांनी दूर ठेवावे व राष्ट्रभक्ती लहानपणापासून मनात रुजवावी. तसेच चंद्रभागेच्या पावित्र्याकडे व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. तसेच लवकरच प्रशांत परिचारकांनी आमदार पदाची सूत्र स्विकारायला जाताना माझ्या घरी नागपुरला नक्की यावे.  याच बरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भरघोस यश प्राप्त करुन सहाय्यक महसूल यापदी निवड झाल्याबद्दल कु. सोनिया शरद कागदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र  विषयात  सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल कु. प्रतीक्षा भारत माळी, दिल्ली कॅपिटल्स संघाच्या टीम डॉक्टर व मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ महिला संभाव्य संघात खेळाडू म्हणून निवड झाल्याबद्दल कु. वेदिका चंद्रकांत मगर,  तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षाखालील मुलिंच्या टी२० व वनडे संघात निवड झाल्याबद्दल कु. भक्ती गणेश पवार  व राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ व निरोगी भारत याविषयी माझ्या पाच कल्पना या शोध निबंधास राष्ट्रपती पारितोषिक मिळाल्याबद्दल चि. संस्कार अशोक आवताडे, व घनकचरा व्यवस्थापन या शोध निबंधास राष्ट्रपती पारितोषिक मिळाल्याबद्दल चि. सार्थक सिध्देश्वर लेंगरे गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व आपल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व बहुमान प्राप्त  झालेल्या प्रा. व्ही. डी. परिचारक, डॉ. कैलाशजी करांडे, अभियंता राजेंद्र माळी, अमरसिंह चव्हाण, अनिरुद्ध बडवे पाटील, या व्यक्तिंचाही बहुमान संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मा. प्रशांतराव परिचारक यांचा सत्कार अमृतभाई पेनूरकर यांनी तर पंचांगकर्ते मोहनजी दाते यांचा सत्कार डॉ. आनंद भिंगे यांच्या हस्ते करण्यात आला. 

संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ देखील मा. आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाला. याचवेळी विविध स्पर्धांचे परिक्षण केलेले परिक्षक वा. गो. भाळवणकर सर,  सौ. जान्हवी पुजारी दुदगीकर, सौ. अंकिता हावगोळ राजे, सौ सारिका कोठाडिया, कु. आरती मनमाडकर, प्रतिभा यादव, सौ. स्नेहल पाठक देशपांडे, राजेश खिस्ते, संजय बडवे सर, प्रद्युम्न कमठाणकर सर,राजेश अंबिके, गजानन सावंत, संतोष कुलकर्णी, यांचा उत्कृष्ट परिक्षण केल्याबद्दल  यथोचित सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले की, कै. सुधाकरपंत परिचारक यांचा आशीर्वाद असल्याने ह्या संस्थेचे कार्य अव्याहत सुरु  असून भविष्य काळात संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. 

सदर कार्यक्रम कर्मयोगी सभागृह  येथे रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५वाजता संपन्न झाला.  कार्यक्रमाची सुरुवात विवेकजी घळसासी यांच्या आयुष्यावर केलेल्या शाहीर विजय व्यवहारे आणि मंडळी यांच्या बहारदार पोवाड्याने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत प्रभाकर बडवे महाजन यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख ज्ञानेश्वर मोरे गुरुजी यांनी करुन दिली. तर उत्कृष्ट सूत्र संचालन डॉ. सौ. मैत्रेयी केसकर यांनी केले.  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलासाधनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत प्रभाकर बडवे महाजन यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. विनायक परिचारक, सचिव ज्ञानेश्वर मोरे, अमरसिंह चव्हाण सर, अभियंता राजेंद्र माळी साहेब, डॉ. कैलाश करांडे, रणजीत पवार, अरिहंत कोठाडिया, अक्षय अनिरुद्ध बडवे, डॉ. किरण बहिरवाडे, अभिराज बडवे, प्रा. राजेंद्र मोरे, राजकुमार शहा, राजकुमार आटकळे, बसवराज बिराजदार,प्रा. मंदार परिचारक,महेश अंबिके, डॉ. बसवराज सुतार, डॉ. आनंद भिंगे, अमृतभाई शहा,  अनंता नाईकनवरे,अशोक आवताडे सर, महेश देशपांडे, नारायण बडवे, सौ. मंदाकिनी देशपांडे,  डॉ. सौ. मैत्रेयी केसकर, सौ. प्रतिभा यादव, प्रद्युम्न कमठाणकर,  शिवाजी यादव आदी कलासाधनाचे सदस्य विशेष योगदान दिले. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, पालक, स्पर्धक, मान्यवर,व पत्रकार बहूसंख्येने उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत अक्षय बडवे यांनी केले तर आभार रणजीत पवार यांनी मानले.

Post Views: 13
Previous Post

पै. श्रीनिवास पाथरूट, जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी यांचा गौरव

Next Post

शिवजन्मोत्सव दिपावलीप्रमाणे घरोघरी साजरा करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिवजन्मोत्सव दिपावलीप्रमाणे घरोघरी साजरा करा

ताज्या बातम्या

इच्छुक उमेदवार म्हणाले पक्ष जे म्हणेल ते खर… #public #marathinews #viral

February 18, 2026

जळगावत खेळताना साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचे डोके ॲल्युमिनियमच्या पातेल्यात अडकल्याची घटना घडली आहे

February 18, 2026

सिंधी रेल्वे स्थानकाजवळ जीटी एक्सप्रेसच्या डब्याला आग.#public #solapurnews #viral

February 18, 2026

केरळमध्ये चिमुकलीच्या अवयव दानामुळे मिळाले पाच जणांना नवे जीवनदान.#viral #पब्लिक

February 18, 2026

शमा उर्दू शाळेत उर्दू दिवस थाटाने संपन्न

February 18, 2026

‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला; अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट आमनेसामने!

February 18, 2026

परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा निश्चित यश मिळेल – डॉ.  आडवीतोट

February 18, 2026

गौड-कलाल समाजाचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन; वधू-वर परिचय मेळाव्यात २५० अधिकांचा सहभाग

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0685785

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697