धाराशिव / लोहारा – उधोग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजा समोर प्रेरणादाई आदर्श निर्माण करणारे लोहारा शहरातील प्रसिद्ध क्लासिक डेव्हलपर्स चे सर्वेसर्वा असलम भाई सय्यद यांना ईगल फाउंडेशन च्या वतीने देण्यात आलेला राष्ट्रीय स्तरावरील उद्योजकरत्न पुरस्कार दि ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी हा सोहळा दिमाखात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्राम विकास मंत्री आ.अण्णासाहेब डांगे, पद्मश्री दादा इदाते, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव चिमणभाऊ डांगे,दैनिक रोखठोक चे संपादक सुरेश वाडकर, ईगल फाउंडेशनचे राज्याचे अध्यक्ष विलासराव कोळेकर प्रा. डॉ.महेश मोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते, सय्यद यांनी समाजभिमुख दृष्टीकोन रोजगारनिर्मिती आणि विकासाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना उधोगक्षेत्राकडे वळविण्याच्या त्याच्या प्रयत्नांची दखल घेऊन सय्यद यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार स्विकृती नंतर सय्यद यांनी फाऊंडेशन चे आभार मानत सांगितले की हा पुरस्कार माझ्या कार्याला नवी प्रेरणा देणारा आहे, समाजाच्या सर्वगीन प्रगतीसाठी काम करत राहणे हीच खरी जबाबदारी आहे, यावेळी उपस्थित मान्यवरांनी सय्यद यांच्या सामाजिक जाण व्यवसायिक प्रामाणिकपणा आणि उधोजकतेतील योगदानाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,




















