सोलापूर : नवी दिल्ली येथील वेल एज्युकेशनल अँड पीस कौन्सिल यांच्याकडून सोलापुरातील दमाणी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक जयकर ठोंबरे यांना मानद ‘डॉक्टरेट इन सोशियल वर्क’ ही पदवी बहाल करण्यात आली.
दिल्ली येथे हा पदवीप्रदान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी खा. प्रविण खंडेलवाल, न्यायाधीश करप्पागा विनायगम (दिल्ली कोर्ट), आ. पूनम शर्मा, समाजसेवक अशोक मेहता, ज्येष्ठ विधिज्ञ तरुण माथुर ,
दिल्ली बीजेपीचे निमंत्रक सेल्वाराज आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
ठोंबरे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. शिक्षक जयकर ठोंबरे हे दमाणी हायस्कूलमध्ये गेली 35 वर्ष अध्यापनाचे कार्य करीत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. जयकर ठोंबरे यांचे शिक्षण क्षेत्रातून आणि डॉ. आंबेडकरी चळवळीतून अभिनंदन व कौतुक होत आहे.


















