परतुर: प्रतिनिधी
परतुर तालुक्यातील पाटोदा माव येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयत किशोर वयीन मुलींसाठी मासिक पाळी व आरोग्य व्यवस्थापण या विषयी श्रीमती अमृता ठाकुर परतुर तालुका समन्वयक आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट मुंबई यांनी उजास प्रकल्प अंतर्गत दिली. किशोर वयातील मुलींसाठी आरोग्य व शिक्षण या बद्दल जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.या दृष्टिकोनातून जालना जिल्ह्यामध्ये उजास काम करत आहे
त्याचाच एक भाग म्हणून तालुका समन्वयक अमृता ठाकूर या आज आमच्या शाळेत भेट देऊन किशोरवयीन मुलींना मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन या विषयात मार्गदर्शन केले यात मासिक पाळी चक्र किशोर अवस्था, शारीरिक बदल मानसिक बदल आहार ,आरोग्य स्वच्छता ,व्यायाम व स्वच्छ मासिक पाळीतील साधनांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर , सहशिक्षक पाराजी रोकडे, उद्धव खवल , विद्यानंद सातपुते, भास्कर कुलकर्णी, धनंजय जोशी,सी,एन.खवल , पांडुरंग डवरे,शंकर खरात , गणेश वखरे आदींची उपस्थिती होती.