अक्कलकोट – संविधानाचा मान- अल्पसंख्यांकांचा सन्मान, अल्पसंख्यांक हक्काचे रक्षण- लोकशाहीचे संरक्षण, अल्पसंख्यांक समाजाचा विकास-देशाचा विकास, संविधानाचे रक्षण- लोकशाहीचे रक्षण या घोषणांनी अक्कलकोट शहराचा परिसर दुमदुमून गेला, निमित्त होते कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने अल्पसंख्यांक दिनानिमित्त आयोजित केलेल्या जाणीव जागृती रॅलीचे महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या व राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने अल्पसंख्यांक दिनानिमित्त खास अक्कलकोट येथील नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी जाणीव जागृती रॅली आयोजित करण्यात आली होती.
महाविद्यालयापासून निघालेली अल्पसंख्यांक रॅली हन्नूर चौक, मल्लिकार्जुन मंदिर, एसटी स्टँड, कारंजा चौक,जुना राजवाडा, स्वामी समर्थ मंदिर परिसरात संपन्न झाली.
रॅलीचे नियोजन कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार, प्रा डॉ शितल झिंगाडे-भस्मे, प्रा सौरभ भस्मे यांनी केले. यावेळी प्रा डॉ बाळासाहेब पाटील, प्रा मधुबाला लोणारी, शिल्पा धूमशेट्टी, सोनाली कटकधोंड, जनाबाई चौधरी, हर्षदा गायकवाड,ओंकार घिवारे उपस्थित होते.
उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, जुनिअर विभाग प्रमुख पुनम कोकळगी,सेमी इंग्लिश विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी अभिनंदन केले आहे.
अल्पसंख्यांकांना हक्क, सुविधा व सवलती मिळाल्या पाहिजेत.
दरम्यान रॅलीच्या आधी ॲड प्रा सोनाली कटकधोंड यांनी आपल्या व्याख्यानातून अल्पसंख्यांकांना त्यांचे हक्क सुविधा व सवलती पासून अधिकारी मंडळींनी वंचित ठेवू नये असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी कर्जाची सुविधा, रोजगाराची संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अल्पसंख्यांक दिनानिमित्त जाणीव जागृती रॅली काढण्यात आली, त्यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक



























