मंगळवेढा – तालुक्यातील नंदूर येथील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा.लि कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात 4 लाख 8 हजार 900 मे.टन ऊस गाळप करून हंगामाची सांगता केली असल्याचे जाहीर केले आहे. उद्योगपती तथा कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके व सरव्यवस्थापक सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगाम सांगता समारंभ उत्साहात पार पडला.
तसेच यावेळी साखर कारखान्यातील उत्पादित 4 लाख 25 हजार 555 साखर पोत्यांचे पूजन अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हाध्यक्षा ह.भ.प.श्रीमती पार्वतीताई आवताडे यांच्या शुभहस्ते व सुनीता पवार, अंजलीताई आवताडे, सुकेशिनी आवताडे, जि.प.सदस्या करुणा शिवशरण, नगरसेविका सावित्री कोंडूभैरी, प्रतीक्षा मेटकरी, विजया गुंगे, तरन्नुम दारुवाले, यशोदा पतसंस्थाच्या चेअरमन निला आटकळे, जिजामाता पतसंस्थाच्या चेअरमन आशा नागणे, सौ.खवतोडे, रोहिणी यादव, अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सदस्या, मोहनीबुवा भजनी मंडळच्या सर्व सदस्या, आसावरी भजनी मंडळाच्या प्रमुख शुभदा जोशी व सदस्या, श्रीराम भजनी मंडळाच्या संगीता आवताडे व सदस्या इतर सहकारी महिला सदस्या यांचे उपस्थित संपन्न झाला.
ऊस टंचाई असूनही कारखाना प्रशासनाने दिवसरात्र काम करत उच्चांकी गाळप करत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे व मार्गदर्शक आ समाधान आवताडे यांनी कारखान्यास सहकार्य केलेल्या सर्व यंत्रणांचे आभार मानले. यावेळी कारखाना कर्मचाऱ्यांना 7 दिवसाचा पगार बक्षीस म्हणून देण्यात येत असल्याची घोषणा केली.
यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले की, चालू हंगामात कारखान्याने एकूण 4,08,890 मे.टन ऊस गळीत करून सरासरी 10.50 टक्के साखर उतारा साध्य केला असून 4,25,555 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. ही कामगिरी शेतकरी, कामगार, अधिकारी व कर्मचारी यांच्या एकजुटीचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या कारखान्याची शासनाने निश्चित केलेली FRP 2500 रुपये प्रति मे.टन असताना कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून 3000 रुपये प्रति मे.टन एकरकमी दर देण्याचा निर्णय घेतला.
चालू वर्षाचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्व खातेप्रमुख, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतुक ठेकेदार,ऊसतोड कामगार यांचे त्यांनी अभिनंदन करून सर्वांचे आभार मानले.
सदर गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी विक्रमी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचा व उच्चाकी ऊस पुरवठादार शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. तसेच नूतन जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे, मि. हणमंत दुधाळ, प्रदीप खांडेकर, मि. जनार्धन शिवशरण, नूतन पंचायत समिती सदस्य विनायक यादव, अर्जुन म्हल्लाळे, मि. श्रीकांत गणपाटील, मि.बाळासाहेब ताड व नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन नगरसेवक सोमनाथ हुशारे, मि.अरुण गुंगे, बाबा कोंडूभैरी यांचाही कारखान्यातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी दामाजी शुगरचे माजी संचालक मि.भारत निकम ,संजय पवार, विजय माने, लेबर फेडरेशनचे संचालक शाम पवार, बिरा कोळेकर, अशोक आसबे, राजू यादव, भीमराव आसबे, बटू आप्पा पवार, ऋतुराज बिले, अशोक भिंगे, शिवाजी मोहिते, शिवाजी पटाप, चंद्रकांत गोडसे, गोविंद भोरकडे, अंबाना ढाणे, बिराप्पा ढाणे, धनंजय पवार, जावेद इनामदार, दत्तात्रय गंगमई आदी मान्यवर, कारखान्याचे वर्क्स मॅनेजर, चिफ केमिस्ट, चिफ अकौंटट, डिस्टिलरी मॅनेजर, शेती अधिकारी, उपशेती अधिकारी, ऊस पूरवठा अधिकारी, एच आर मॅनेजर, विभागप्रमुख, कर्मचारी, ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखर पोती पूजन करताना ह.भ.प.श्रीमती पार्वतीताई आवताडे, सुनीता पवार, अंजलीताई आवताडे, सुकेशिनी आवताडे, जि.प.सदस्या करुणा शिवशरण, नगरसेविका सावित्री कोंडूभैरी, प्रतीक्षा मेटकरी, विजया गुंगे, तरन्नुम दारुवाले, यशोदा चेअरमन निला आटकळे, जिजामाता चेअरमन आशा नागणे, शुभदा जोशी, संगीता आवताडे व सदस्या

























