सोलापूर : महापालिकेच्या वतीने 16 डंपर आणि 10 जेसीबीच्या साह्याने विविध 21 ठिकाणी आजोरा हटाव मोहीम राबविण्यात आली. एकूण 83 खेपा करून अजोरा उचलण्याचे काम करण्यात आले. स्वच्छ सोलापूर – सुंदर सोलापूर असा संदेश या द्वारे देण्यात आला.
“सोलापूर सुंदर सोलापूर” या उपक्रमाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त विणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रस्त्यावरील पडलेला अजोरा ,मलबा, बांधकामातील अवशेष, कचरा उचलण्याची विशेष मोहीम दर शुक्रवारी व शनिवारी नियमितपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अजोरा उचलण्यात आला.
या मोहिमेसाठी घनकचरा विभागाच्या माध्यमातून 16 डंपर तसेच विभागीय कार्यालयांकडून 10 जेसीबी अशी यंत्रसामग्री वापरण्यात आली. या माध्यमातून आज एकूण 21 ठिकाणहुन सुमारे 83 खेपा करून अजोरा उचलण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विभागीय अधिकारी यांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता करण्यासाठी मोठी मदत झाली असून नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर सोलापूर करण्याचा संदेश देण्यात आला आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरात अजोरा किंवा बांधकामातील अवशेष रस्त्यावर टाकू नयेत. अजोरा उचलण्यासंदर्भात नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, जेणेकरून “सोलापूर सुंदर सोलापूर” हे स्वप्न साकार करता येईल, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले आहे.
या ठिकाणी राबविली आजोरा हटाव मोहीम
शहरातील बोरामणी नाका, दयानंद महाविद्यालय, होमकर नगर, हिप्परगा,हवामान केंद्र शांती नगर, मौलाना आझाद चौक आयएमएस शाळा, कुमठेकर हॉस्पिटल ते बंधानल मठ, कंबर तलाव मैदान अशोक नगर, शासकिय मैदान परिसर, अमृत नगर, बेघर सोसायटी सोशल कॉलेज रोड, फडकुले सभागृह समोर, मसीहा चौक ते वांगी रोड शानदार चौक ते लेप्रसी कॉलनी रोड या ठिकाणी अजोरा उचलण्यात आला. शहरातील 21 ठिकाणांवरील अजोरा हटविण्यात आला
















