सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरातील 20 ठिकाणी रस्त्यावर पडलेला आजोरा व बांधकाम अवशेष हटविण्याची मोठी मोहीम राबविण्यात आली. 10 जेसीबी, 12 डंपर अशी मोठी यंत्रसामग्री वापरण्यात आली. दिवसभरात एकूण 73 खेपा करून आजोरा व कचरा हटविण्यात आला.
“सोलापूर सुंदर सोलापूर” मोहिमेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त विणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील अनेक भागांत रस्त्यावर पडलेला आजोरा व बांधकाम अवशेष हटविण्याची मोठी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत बोरामणी नाका, दयानंद महाविद्यालय परिसर, होमकर नगर, हिप्परगा, हवामान केंद्र, शांती नगर, मौलाना आझाद चौक, आयएमएस शाळा रोड, कुमठेकर हॉस्पिटल बंधनल मठ मार्ग, धर्मवीर संभाजी महाराज तलाव (कंबर) मैदान, अशोक नगर, शासकीय मैदान परिसर, अमृतनगर बेघर सोसायटी, सोशल कॉलेज रोड, डॉ. फडकुले सभागृह, मसीहा चौक ,वांगी रोड व शानदार चौक लेप्रसी कॉलनी रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजोरा उचलण्यात आला. या कामासाठी महानगरपालिकेकडून 10 जेसीबी, 12 डंपर अशी मोठी यंत्रसामग्री वापरण्यात आली. दिवसभरात एकूण 73 खेपा करून मोठ्या प्रमाणात आजोरा व कचरा हटविण्यात आला.
सार्वजनिक जागेत आजोरा, बांधकाम कचरा टाकू नये : वीणा पवार
या उपक्रमामुळे संबंधित परिसरांतील रस्ते व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ झाली असून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. महानगरपालिकेने नागरिकांना सार्वजनिक जागेत आजोरा किंवा बांधकाम कचरा न टाकण्याचे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले आहे.


















