बार्शी – शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय येथे बी.ए.एम.एस. (BAMS) प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा संस्कृत संभाषण वर्ग दिनांक ८ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झाला.
समारोप कार्यक्रमाच्या प्रारंभी धन्वंतरी पूजन व स्तवन झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य वैद्य शांतीनाथ बागेवाडी, वैद्य विवेक चांदुरकर, वैद्य अविनाश चव्हाण, संहिता विभाग प्रमुख वैद्या ज्योत्स्ना गंगासागरे, वैद्या दिपाली मगरे, वैद्या स्मिता गोटीपामुल, वैद्य अमोल वेल्हाळ, वैद्या सोनाली बगले, संभाषण वर्ग शिक्षक निखिल बडवे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्या ज्योत्स्ना गंगासागरे यांनी केले. उपप्राचार्य वैद्य शांतीनाथ बागेवाडी यांनी निखिल बडवे यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून नाटक, कोडी, गीत, संवाद, मनोगत इत्यादी कार्यक्रम सादर केले.
उपप्राचार्य वैद्य शांतीनाथ बागेवाडी यांनी आपल्या मनोगतातून संस्कृतचा उपयोग सर्व स्तरातून होत आहे हे सांगितले. निखिल बडवे यांनी संस्कृत ही केवळ आयुर्वेदाची भाषा नव्हे तर सध्याच्या काळात मोबाईल, संगणक, रिल्समधून सुद्धा संस्कृत आहे हे सांगितले. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही संस्कृत बोलतात, असे उदाहरण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी व मृणाल तर आभार मृणाल हिने मानले.




















