भोकरदन : युवराज पगारे
आगामी बदनापूर अंबड विधानसभा निवडणुकीत मातंग बौद्ध समाजाचे डॉक्टर संजय पगारे यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे मातंग बौद्ध समाजाने जाहीर केल्याने आमदार नारायण कुचे यांचे टेन्शन वाढणार अंबड भोकरदन बदनापूर विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने बदनापूर येथे बौद्ध व मातंग समाजाच्या सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बदनापूर येथे एल्गार पत्रकार परिषद पार पडली, बदनापूर अंबड विधानसभा निवडणुकीमध्ये एससी आरक्षण सुटलेले असतानाही देखील इतर पक्ष आम्हाला उमेदवारी देत नाही आणि आमचे या विधानसभा मतदारसंघात एकूण 72 हजार मतदान आहे,त्यामुळे या बैठकीत सर्वानुमते उमेदवार जाहीर करण्यात आला असून शिव,फुले, शाहू, आंबेडकर व अण्णाभाऊ साठे या थोर महापुरुषांच्या पुरोगामी विचारांचे उच्चशिक्षित अभ्यासू व कृतिशील व्यक्तिमत्त्व असलेले डॉक्टर संजय पगारे यांना बदनापूर विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उमेदवारी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे,
दरम्यान डॉक्टर संजय पगारे यांचा जन्म भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथे झाला असून त्यांचे शिक्षण एम, बी एस, एस, एम, डी.स्त्री रोग तज्ञ झाले असून त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे हजारो रुग्णांची सेवा केली असून मात्र आता आपल्या समाजातील गोरगरिबांना न्याय देण्यासाठी त्यांनी समाजकार्याची आपल्या पालखी खांद्यावर घेतली आहे,
दरम्यान बदनापूर येथे पत्रकार परिषदे घेऊन सर्व बौद्ध समाज व मातंग समाजांना कळविण्यात आले, बदनापूर तालुक्यामध्ये घरोघरी जाऊन तसेच पत्रकार परिषद व मिळावे घेऊन आम्ही सर्व बौद्ध मातंग बांधवांनी बदनापूर अंबड विधानसभेमध्ये एससी समाजातून गेल्या तीन टर्म पासून एससी समाजाला सुटलेला आहे, तरी सुद्धा प्रस्थापित पक्षानी मागासवर्गीयाचा विचार केला नाही, दलित समाजाच्या बौद्ध व मातंग समाजाचा विचार केलेला नाही, त्या कारणाने सर्व मातंग व बौद्ध समाजाचा असं म्हणणं आहे की आमचं बदनापूर तालुक्यामध्ये एससी समाजाच 72 हजार मतदान आहे,
इतकं मतदान असून देखील आमच्या समाजावर अन्याय होत आहे, बाहेरून आयात केलेले लोक यांना चालतात या प्रस्तावित पक्षांना आमचा मातंग बौद्ध समाजाचा उमेदवार चालत नाही त्यांना त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाचा तरुण उमेदवार उभा करणार आहे, समोरच्या कोणत्याही पक्षाने किंवा महाविकास आघाडीने उमेदवार टाकला तर त्याला आम्ही आमचे मतदान करणार नाही असा एक मुखाने या एल्गार परिषद मध्ये निर्णय झाला आहे, याप्रसंगी डॉक्टर संजय पगारे, सुरेश खंडागळे,अनिल चौतमाल, भाऊसाहेब काकडे,कैलास पाजके, बाबासाहेब सोनवणे, सुभाष मगरे,अनिल उगले, संतोष शेळके,गौतम गायकवाड,कचरू रेगुडे, मिलिंद रगडे यांच्यासह समाजातील कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,