भोकर(प्रतिनिधी)भोकर मतदारसंघात बहुजन नेते म्हणून ओळख असलेले नागनाथ घिसेवाड यांचा वाढदिवस १५ऑगस्ट रोजी भोकर मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.बहुजनांचे नेतृत्व म्हणून ओळख असलेले नागनाथ घिसेवाड यांनी गेली ४०वर्षापासून अखंडपणे संघर्ष करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला विधानसभेला मात्र अल्पशा मतांनी पराभव झाला तरी आपले बहुजन हिताचे कार्य त्यांनी चालूच ठेवले. कै.लक्ष्मणराव घीसेवाड विद्यालयात १५ आँगष्ट रोजी अभिष्टचिंतन सोहळा साजरा झाला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण,ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,बंजारा समाजाचे नेते डॉ.उत्तम जाधव,भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण भाऊ गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सतीश देशमुख,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष आलेवाड,शंकर मुतकलवाड,खालेद मौलाना,जुनेद पटेल,दिलीप तिवारी आदींची उपस्थिती होती
प्रारंभी कै.लक्ष्मणराव विद्यालय व हायस्कूलच्या वतीने शिक्षक विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा केला त्यानंतर झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवरांनी घीसेवाड यांच्या राजकीय सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून येणाऱ्या भविष्यकाळात आपली राजकीय वाटचाल यशस्वी होईल असा शुभ संकेत दिला.सत्काराला उत्तर देताना घिसेवाड म्हणाले कि भोकर मतदार संघात मागील ३० वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या सेवेत राहून प्रस्थापितांच्या विरोधात आपण लढा दिला, बहुजन समाजाचे संघटन केले,
वेगवेगळे गुन्हे दाखल करून अनेक षडयंत्र रचून मला संपवण्याचा प्रयत्न केला मात्र तेच संपले मी मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे अजूनही खंबीरपणे उभा आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार सोबत घेऊन माझी वाटचाल अजूनही चालू आहे, सर्वसामान्य जनतेची ताकद माझ्या पाठीशी असल्यामुळे मी सर्वांच्या सेवेसाठी तत्पर राहील असा ठाम विश्वास यावेळी बोलताना नागनाथ घीसेवाड यांनी व्यक्त केला यावेळी विद्यार्थी विद्यार्थीनी ग्रामीण भागातून आलेले नागरीक उपस्थित होते.सूत्रसंचलन बि.आर.पांचाळ यांनी केले तर आभार नागोराव शेंडगे यांनी मानले.