बार्शी – बार्शी तालुक्यातील पंचायत समितीच्या एकूण १२ निवडणूक गणांच्या आरक्षण प्रक्रियेची सोडत आज बार्शी पंचायत समिती कार्यालय, बार्शी येथे जाहीर करण्यात आली. या प्रक्रियेत सर्वसाधारण, अनुसूचित जाती तसेच महिला राखीव जागांचे वाटप निश्चित करण्यात आले असून, ही प्रक्रिया पारदर्शक वातावरणात पार पडल्याची माहिती तहसील एफ. आर. शेख यांनी दिली.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तर तहसीलदार शिल्पा ओसवाल, गटविकास अधिकारी विवेक जगनाडे, निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे, निवडणूक नायब तहसीलदार संजीवन मुंढे, महसूल नायब तहसीलदार सानप तसेच अधिकारी, लोकप्रतिनिधी व पत्रकार यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले.
पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित झाले आहे —
क्र. निवडणूक गणाचे नाव आरक्षण प्रकार
१) उपकाई ( ठों.) – सर्वसाधारण महिला २) आगळगाव – ना.मा.प्र. महिला ३) पांगरी – अनुसूचित जाती ४) कारी – ना.मा.प्र. ५) उपळे दुमाला – ना.मा.प्र. महिला ६) गौडगाव – सर्वसाधारण ७) बावी – सर्वसाधारण ८) पानगाव – सर्वसाधारण ९) मालवंडी – सर्वसाधारण महिला १०) सासुरे – सर्वसाधारण ११) मानेगाव – सर्वसाधारण महिला १२) शेळगाव (आर) – अनुसूचित जाती महिला
या आरक्षण जाहीरनाम्यानंतर पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, विविध गावांमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चांना सुरुवात झाली आहे. तर आरक्षणाच्या फेरबदलामुळे काही इच्छुक कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.