बार्शी – सेंट जोसेफ बार्शी या शाळेमध्ये शिकणारी कु. ओवी नागनाथ बुरांडे. इयत्ता ८ वी या विद्यार्थ्यांनीची इस्त्रो सहलीसाठी निवड झाली. तिने नोबेल फाऊंडेशन जळगाव आयोजित एनएसटीएस परिक्षेच्या तिन्ही आव्हानात्मक पातळ्यांवर यशस्वीरित्या उत्तीर्ण होत इस्त्रोच्या सहलीसाठी झेप घेतली. जिद्द , चिकाटी आणि अथक परिश्रमाने तिने या यशाला गवसणी घातली आहे.
तिच्या या यशामध्ये मि.जयदिप पाटील सर , अध्यक्ष नोबेल फाऊंडेशन, व सेंट जोसेफ शाळा बार्शी चे मुख्याध्यापक तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व विज्ञान विभागाच्या शिक्षकांचे आणि पालकांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. तिच्या पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.




















