बार्शी – बार्शीच्या सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय मंचावर झळकण्याची संधी मिळाली आहे. इयत्ता सातवीत शिकणारा बार्शी येथील सोहम राऊत व त्याचे वडील सचिन राऊत हे २६ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या भव्य परेडमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने ‘वंदे मातरमची १५० वर्षे’ या ऐतिहासिक थीमवर आधारित चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सचिन व सोहम राऊत यांचा सहभाग होता. संगीत नाटक अकादमी आणि उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त आयोजनात देशभरातील पारंपरिक लोकवाद्यांचे सादरीकरण झाले असून, या समूहात सोहम शहनाई आणि संबळ वाजले आहे. महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथे शिक्षण घेणारा सोहम हा सुप्रसिद्ध शहनाई वादक सचिन राऊत यांचा मुलगा आहे. वडिलांकडून बार्शीकरांसाठी गौरवाची व अभिमानास्पद बाब दिल्लीतील कर्तव्यपथावर सनई वादन केले राऊत पिता-पुत्रानी. मिळालेल्या कलेच्या वारशाला त्याने कठोर अभ्यास आणि अखंड साधनेने पुढे नेले आहे. अल्पवयातच राष्ट्रीय स्तरावरील या सर्वोच्च व्यासपीठावर पोहोचणे हे सोहमच्या प्रतिभेचे, संस्कारांचे आणि जिद्दीचे उत्तम उदाहरण आहे. लोप पावत चाललेल्या लोककलांना नवसंजीवनी देणारा त्याचा हा प्रवास तरुणपिढीसाठी प्रेरणास्थान ठरणारा आहे.
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पंडित लोकेश आनंद यांच्या हाती असून, पुण्याचे नामवंत शहनाई वादक पंडित प्रमोद गायकवाड आणि त्यांचे १८ शिष्य यात सहभागी झाले होते. .्श््श् शहनाई, सुंदरी, संबळ अशा पारंपरिक वाद्यांच्या सुंदर संगमातून भारतीय संस्कृतीचे वैभव दाखवले गेले आहे.
विशेष बाब म्हणजे सांस्कृतिक मंत्रालयाकडून सोहमला शहनाई वादनासाठी दोन वर्षांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे, जी त्याच्या मेहनतीची आणि कलेच्या गुणवत्तेची पावती आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथील संपूर्ण शिक्षकवर्ग, केंद्र संचालक डॉ. अबोली सुलाखे, वीर सावरकर रोड मित्र मंडळ आणि बार्शीवासीयांकडून राऊत पिता-पुत्रांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
















