सोलापूर – अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील श्री अय्यप्पास्वामी अन्नदान सेवा संघातर्फे आयोजित श्री अय्यप्पास्वामी दीक्षा कार्यक्रमास सोमवारपासून प्रारंभ झाला. यामध्ये १०४ भक्तगण सहभागी झाले आहेत.
माळधारण करुन या दिक्षेचा प्रारंभ करण्यात आला.देशभरात कार्तिक पौर्णिमा ते मकरसंक्रांती या कालावधीत श्री अय्यप्पास्वामींचे भक्त ४८ दिवसांची मंडल दीक्षा (व्रत) घेतात. या दीक्षेचा प्रारंभ माळधारणेने करण्यात येतो. सोलापुरात श्री अय्यप्पास्वार्मीचे हजारो भक्तगण आहेत. यापैकी शेकडो भक्त गट स्थापून सामूहिक दीक्षा घेतात.
याअंतर्गत श्री अय्यप्पास्वामी अन्नदान सेवा संघातर्फे सोमवार, दि. १ डिसेंबर रोजी श्री धर्मशास्ता चॅरिटेबल ट्रस्ट श्री अय्यप्पास्वामी मंदिर येथे पहाटे ६ वाजता माळधारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरातील आचार्य आनंद गुर्रम, वसंत गोसकी व रचन भंडारी यांच्या हस्ते दिक्षेत सहभागी होणाऱ्या भक्तांना माळ घालण्यात आला.
याप्रसंगी संघाचे संस्थापक सत्यनारायण भंडारी,अध्यक्ष रचन भंडारी, उपाध्यक्ष प्रकाश चन्ना, खजिनदार भूमण्णा कोंडी, सचिव अरविंद जिल्ला, विश्वस्त नरेश भंडारी, विकास पलगंटी, रमेश गरदास, श्रीनिवास सुरा, वासुदेव शेरला, नरेश मैले, विशाल नल्ला, आयलेश यल्ला, सुहास पल्ली आदी उपस्थित होते.
दीक्षा कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
दिक्षेच्या ४८ दिवसांच्या कालावधीत संघातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, भजन कार्यक्रम व सत्संग व गुरुचरित्र पारायण,तसेच अन्नदान सेवा संघाचा १८ वा वर्धापन दिन कार्यक्रम, गुरुस्वामींचा सत्कार तसेच ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज यांचे ६८ लिंग प्रदक्षिणा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. असे अध्यक्ष रचन भंडारी यांनी यावेळी सांगितले.
————————-
अय्यप्पास्वामी अन्नदान सेवा संघातर्फे आयोजित माळधारण कार्यक्रमात सहभागी झालेले सत्यनारायण भंडारी, प्रकाश चन्ना, रचन भंडारी, भूमणा कोंडी, अरविंद जिल्हा, अनिल चिप्पा, श्रीनिवास सुरा, वासुदेव शेरला, आयलेश यल्ला, विकास पलगंटी आदी.


























