सांगोला – तालुक्यातील विशेष सहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी यांनी दर वर्षी एप्रिल ते जुन या महिन्यात हयात असलेबाबत दाखले जमा करणे आवश्यक असते. परंतु सांगोला तालुक्यातील ब-याच लाभार्थी यांनी हयात असलेबाबतचे दाखले जमा केले नाहीत. दाखले जमा न केलेमुळे अनुदान बंद होऊ शकते. तरी ज्या लाभार्थी यांनी हयात दाखले जमा केले नाहीत त्यांनी पंधरा दिवसात उत्पन्न दाखल्यासह हयात दाखले गावचे ग्राम महसुल अधिकारी यांचे कडे जमा करावेत. अन्यथा अनुदान हयात दाखला देईपर्यंत बंद होणार आहे अशा सुचना प्राप्त झाल्याची माहिती सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.
दिव्यांग लाभार्थी यांना संजय गांधी योजनेमार्फत १५०० रुपये अनुदान वितरित होत होते. त्यामध्ये वाढ करुन ऑक्टोंबर २०२५ पासुन २५०० रुपये करण्यात आलेले आहे. परंतु काही लाभार्थी यांना १५०० रुपये अनुदान प्राप्त झाले बाबत तहसील कार्यालयास अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याअनुशंगाने सांगोला तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी यांना कळविणेत येते की, त्यांनी दिव्यांग लाभार्थी प्रमाणपत्र प्रत, आधार कार्ड प्रत तहसील कार्यालय अथवा आपले गावचे ग्राम महसुल अधिकारी कार्यालयात जमा करावी असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी केले आहे.

















