सोलापूर – करीमनगर , तेलंगणा राज्यात ज्युनिअर, मास्टर्स भारत श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सोलापूर पोलीस दलात कार्यरत असणारे भागवत शिंदे यांनी 40 + भारत श्री मास्टर्स स्पर्धेत महाराष्ट्र कडून प्रतिनिधित्व करताना पाचवा नंबर प्राप्त केला . पोलिस खात्यातील आपले कर्तव्य सांभाळत अतिशय मेहनत करून यश प्राप्त केले .
या यशाबद्दल सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन चे अध्यक्ष संतोष भाऊ पवार व सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी अभिनंदन केले .

























