तभा फ्लॅश न्यूज/कंधार : भाई केशवराव धोंडगे यांची भाषणे ऐकण्यासाठी आम्ही विधानसभेच्या गॅलरीत जायचो त्यांच्या आवाजात एक मर्दानगी होती.ती भाषणे आम्हाला स्वाभिमान शिकवतात.तोच वारसा पुरूषोत्तमराव तुम्ही विधानसभेत जपा असे उद्गागार माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर प्रा.डॉ.पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवेश प्रसंगी काढले.
मुंबईत मुसळधार पाऊस असतानाही हजारो शिवसैनिक व कार्यकर्त्यांसह प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांचा प्रवेशसोहळा “मातोश्री” येथे पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुखांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पावसात शिवसैनिकांचा उत्साह पाहून त्यांच्या जीद्दीला मानाचा मुजरा म्हणत कौतूक केले.
यावेळी शिवसैनिकांनी उध्दव साहेब तुम आगे बढो…, शिवसेना जिंदाबाद.. च्या घोषणानी कलानगर परिसर दणाणून सोडला.ह्यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत,शिवसेना नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,उपनेते बबन थोरात,लातूर संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण,लातूर जिल्हाप्रमुख बाळाजी रेड्डी,उपतालुकाप्रमुख भालचंद्र नाईक,लोहा-कंधार विधानसभा समन्वय गणेशभाउ कुंटेवार,पंचायत समिती सदस्य नवनाथ बापू चव्हाण,तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव,लोहा तालुकाप्रमुख भिमराव पाटील शिंदे,तालुकासंघटक पंडितराव देवकांबळे,शहरप्रमुख अतुल पापीनवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रवेशाचे प्रास्ताविक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केल्यानंतर पुरूषोत्तम धोंडगे बोलताना म्हणाले की माझे जिवन मी माझे वडील केशवराव धोंडगे यांना समर्पीत करतो अन त्यानंतर माझं आयुष्य उध्दवजी तुमच्या साठी अन शिवसेनेसाठी असेल अन जिवाच्या शेवटच्या रक्तापर्यत मी उध्दवजी सोबत राहील असा विश्वास व्यक्त केला. तद्नंतर रोहीदास चव्हाण पक्षाचे आभार व्यक्त केले.
जो आपण धोंडगे परिवाराकडून शिवसेनेने आमदारकी काढली पुन्हा ती पुरुषोत्तम च्या रूपाने द्यावे असे बोलले. तद्नंतर मार्गदर्शन करताना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे म्हणाले की पावसाने इतका हाहाकार केला असताना पुरूषोत्तम यांनी इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते घेऊन येऊन जी जिद्द दाखविली त्यास मानाचा मुजरा असेही त्यांनी कौतुक केले.माजी आमदार व खासदार भाई डॉ भाई केशवराव धोंडगे ह्याच्या बदल बोलताना उध्दवजी म्हणाले आता आमच्या कडे देण्यासारखे काही नाही तरी तुमचा प्रवेश एक चैतन्य निर्माण करणारा आहे.
हीच जिद कायम ठेवा आणि केशवराव धोंडगे यांचा आवाज व वारसा विधानसभेत गर्जू देत असा आशिर्वाद रुपी शुभेच्छा त्यांनी दिला.पाऊस खुप आहे सांभाळून जा असे आवाहन ही त्यांनी केले.यावेळी नगरसेवक आरूण बोधनकर,दादाराव पाटील शिंदे, मारोती डोईजड,राजेश्वर किडे, शंकर चिवळे, गणेश अप्पा स्वामी, यादवराव घुमे,माधव पाटील भालेराव, गणेश कीडे, बाबाराव पाटिल शिंदे,शेख गौस,अमर टेलर यांच्या सह हजारो शिवसैनिक,पदाधिकारी, युवा सैनिक उपस्थित होते.