सोलापूर – जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील शालेय विभागीय स्पर्धा शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हाळुंगे – बालेवाडी, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मॅनेज्ड बाय – इंडियन मॉडेल स्कूल, सोलापूर येथील 17 वर्षाखालील वयोगटात मैदानी स्पर्धेत मुलींमध्ये कुमारी भक्ती महेश थोरात ही लांब उडी व 100 मीटर अडथळा रनिंग या गटा मध्ये प्रत्येकी प्रथम क्रमांक पटकविली आहे. तीची राज्य स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.या स्पर्धेला क्रीडा शिक्षक प्रमोद म्हेत्रे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेचे कमिटी सदस्य पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त हसन गौहर, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, आय.एम.एस. ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव अमोल जोशी, साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, ममता बसवंती व मुख्याध्यापिका स्वाती कारंडे यांनी अभिनंदन केले.




















