नांदेड – आदिवासी संस्कृतीतील वाद्य निर्मिती करणाऱ्या भालेराव दडांजे यांचा पुरस्कार म्हणजे आदिवासी संस्कृती व किनवट माहूर तालुक्याचा सन्मान आहे असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले राज्य शासनाचा २०२५चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार भालेराव दडांजे यांना जाहीर झाला त्यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी आमदार केराम बोलत .आज दि ७डिसेंबर रोजी आ केराम यांच्या निवास्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या वयोवृद्ध कलाकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. कलाक्षेत्रातील 24 प्रकारात राज्य सांस्कृतिक व राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो . नुकतेच २०२४ व २०२५ या वर्षातील कलाकारांना संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. किनवट माहूर तालुक्यातील दुर्मिळ अशा दंडार, ढेमसा व विदर्भातील झाडीपट्टी लोकनृत्यासाठी लागणाऱ्या वाद्याची निर्मिती करणारे भालेराव नागोराव दडांजे यांना 2025 चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
दिनांक 3 डिसेंबर रोजी सांस्कृतिक विभागाच्या वतीने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. नागोराव दडांजे यांना वाद्य निर्मिती चा राज्य पुरस्कार मिळाला आहे.आदिवासी गौरव वर्ष साजरे करत असताना आदिवासी कलाकाराचा सन्मान होणे किनवट तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे आमदार भीमराव केराम यांनी यावेळी सांगितले.आदिवासी लोककलेचे अभ्यासक डॉ सुनील व्यवहारे यांनी किनवट तालुक्यातील आदिवासी दुर्गमगाव बुधवार पेठ येथील वाद्य निर्मिती करणारे भालेराव नागोराव दडांजे यांचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठविला होता. यापूर्वी २०१९ मध्ये पाटागायन करणारे मोहन मेश्राम यांना आदिवासी गिरीजन पुरस्कार प्राप्त झाला आहे.
यावेळी आनंद मच्छेवार,राजेंद्र केशवे, यशवंत कराळे, श्रीनिवास नेम्मानीवार, मारोती सुंकलवाड , उत्तम जाधव, मारुती भरकड,रमेश बद्दीवार ,लच्छू सिडाम, सुदर्शन कुडमेते, निळकंठ कातले, प्रकाश कुडमेते, बंटी फड, संतोष मरस्कोले ,विश्वास कोल्हारीकर, बाळकृष्ण कदम, मोहन दडंजे , जंगू मडावी, तेलंगराव कुडमेते अविनाश पेंदोर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
























