सख्ख्या भावाने दारूच्या नशेत केला मोठ्या भावाचा खून
भंडारा, 21 जुलै (हिं.स.)।दारूच्या नशेत लहान भावाने मोठ्या भावाचा लाठीकाठी व लोखंडी पाऊसीने डोक्यावर व गालावर वार करीत खून केला. तेजेंद्र नागलवाडे (३२) असे मृतकाचे नाव असून प्रवीण नागलवाडे (२८) आरोपीचे नाव आहे.
ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील न्याहारवाणी /डोंगरगाव येथे घडली.आरोपीवर १०३(१) भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला पालांदूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.