भंडारा जिल्ह्यात शाळकरी मुलांच्या पूरक आहारावर शिक्षक डल्ला मारत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालकांनी चौकशीची मागणी केलीय.
कुपोषणावर मात करण्यासाठी शाळा मध्ये मुलांना पोषण आहार दिला जातो. लहान मुलाना पोषण आहार सोबतच पूरक आहार देण्यात येत आहे. आठवड्यातून एकदा बुधवारी विद्यार्थ्यांना अंडी, केळी दिली जातात. प्रती अंडी 5 रूपये दराने शासन प्रत्येक शाळेला पैसा देतो. मात्र याच पूरक आहारावर आता शिक्षकच डल्ला मारत असल्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथिल प्राथमिक शाळेत उघल झाला आहे. शिक्षक मुलांना पोशण आहार देतात मात्र अंडी व केळी देत नाही. एका शिक्षकांचा रिटायरमेंट असल्याने त्याच दिवशी अंडी देण्यात आल्याचे विद्यार्थ्यानी सांगितले. पालकांनी सुध्दा या चौकशीची मागणी केली आहे.
राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार अनुदानीत शाळेत मुलाना अंडी देणे बंधनकारक आहे. शासन त्या शाळेला 5 रूपये दराने पैसे सुध्दा देत आहे. जर शाळेत विद्यार्थ्याना अंडी दिली जात नसेल तर याची चौकशी करुन पुढील कारवाही केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे.