भारत गॅस एजन्सीचालकांचा भोंगळ कारभार;संबधिताचे दूर्लक्ष
भोकर(प्रतिनिधी)शहरात भारत गॅस एजन्सीकडे ग्राहकांनी सिलेंडरची बूकींग केल्यानंतरही चार चार दिवस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने एजन्सीचालकांविषयी ग्राहकामध्ये असंतोष पसरला आहे.
भोकर शहरात शिवसाई गॅस एजन्सीकडून भारत गॅसचे सिलेंडर ग्राहकांना वितरित केले जाते मागील अनेक दिवसापासून एजन्सीचालकांचा भोंगळ कारभार सूरु असून सिलेंडरची बूकींग केल्यानंतर शहरातील ग्राहकांना काही तासात घरपोच सिलेंडर उपलब्ध करुन दिले पाहिजे परंतू चार चार दिवस ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध होत नाही परिणामी एजन्सीकडे ग्राहकांना जावून सिलेंडर आणावे लागत आहे.
एजन्सी चालकाचा कारभार मनमानी चालू आहे.भारत गॅस एजन्सीकडे पूरवठा विभागाचे अक्षम्य दूर्लक्ष दिसून येते ग्राहकांना वेळेवर सिलेंडरचा पूरवठा केला जात नाही नियमबाह्य रस्त्यावर सिलेंडर ठेवून ग्राहकांना दिले जाते मागील काही दिवसापासून भारत गॅस एजन्सीचालकांची मनमानी सूरु असल्याचे निदर्शनास येत असून संबधित विभागाकडून सदरील एजन्सीचालकांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.