जालना – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड जूना जालना येथे 14 हजार 135 लाडु महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी महाप्रसाद लाडुचे वाटप व जार पाणी वाटप निस्वार्थपणे करण्यात येते. याहीवर्षी 14,135 लाडु महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने जूना जालना, कॅपीटल कॉम्प्लेक्स येथील सुरेश रत्नपारखे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत लाडु महाप्रसाद वाटप समितीची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. त्यामध्ये लाडु महाप्रसाद वाटप समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर निकाळजे, कार्याध्यक्ष इब्राहिम शेख, उपाध्यक्ष संदीप हिवराळे, उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, निखील पगारे, संजय इंगळे, फिलीप्स उगले,सुनिल रत्नपारखे, रंजित अरूण मगरे, प्रदिप मघाडे, अश्विन अंबेकर, बाबा पठाण व्यवस्थापक सुरेश रत्नपारखे, सचिव बाबासाहेब वानखेडे, सहसचिव गोकुळ स्वामी, सुधाकर रत्नपारखे, संदीप बाबासाहेब वानखेडे, गौतम वानखेडे सदस्य दिवाकर मगरे,ॲड. अर्शद बागवान, योगेश रत्नपारखे, अमोल ठाकुर, मुन्ना भोसले, संतोष जमधडे, दीपक वैद्य, राहुल रायकर, कडुबा वाकीकर, अरविंद देशमुख, सुरेश खरात, अर्जुन पाथरकर, ॲड. संजय काळबांडे, शिवलाल घाडगे, नंदकिशोर जांगडे, सुरेश दांडगे, दिलीप मुळे,गणेश वाघमारे, रविंद्र हेलगट, रविंद्र मगरे, संदीप डोंगरे, देवानंद डोईफोडे, निखील पगारे, बाबुलाल महाराज (राजस्थान), नंदकुमार क्षिरसागर, विठ्ठल बोरकर, शिवाजी खांडेभराड, गजानन खांडेभराड, शांतीराम खांडेभराड, लक्ष्मीनारायण कदम, हरेश रत्नपारखे, शिवकुमार राऊत, अमोल धानुरे,सतीश खांडेभराड, राहूल मुळे, अमरदिप शिंदे, लक्ष्मण इधाटे, सचिन वानखेडे, निलेश वानखेडे, बाबासाहेब सोनवणे, नितीन इंगळे, धनंजय देशमुख, नितीन तायडे, राजेंद्र शिंदे, विनोद भालेराव ,प्रतिक लांडगे, रमेश मुळे, डॉ. श्रावण शेवाळे, सोनु वाघमारे, वंदना खांडेभराड, गंगुबाई वानखेडे, मंगला खांडेभराड, यांचा समावेश आहे.


























