सोलापूर :- भारतीय जैन संघटना व राष्ट्रीय कर्मचारी सेना सोलापूर विभाग यांच्या वतीने सोलापूर बस स्थानकातील बस चालक ,वाहक व प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांना जैन संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण करून फराळ देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य श्याम पाटील, विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते, विभागीय अध्यक्ष माया पाटील यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.प्रारंभी चालक वाहक व प्रवासी यांना औक्षण करण्यात आले.यावळी आपल्या मनोगतातून अभिनंदन विभूते यांनी भारतीय जैन संघटनेच्या कार्याबद्दल सर्व माहिती दिली. प्रत्येक सणाच्या वेळी चालक वाहकांनी आपले घरदार, सण आणि उत्सव सोडून प्रवाशांच्या सेवा करण्यामध्ये मग्न असतात म्हणून या लोकांच्या समावेत भाऊबीज करण्याचा आनंद वेगळाच अनुभव देऊन जातो असे मत संघटनेचे श्याम पाटील यांनी व्यक्त केले.
मुक्कामाला असलेले आणि सकाळी सकाळी प्रवाशांना त्यांच्या निर्धारित स्थळा पर्यंत बसने पोचवण्यासाठी सज्ज असलेली चालक वाहकांना बस स्थानकावरच एकत्रित बोलावून औक्षण करून फराळ वाटप करण्यात आला. या अचानक घडलेल्या औक्षण कार्यक्रम पाहून त्यांच्या आनंदाला परिसीमच नव्हता चालक वाहकाने म्हणाले की, आम्ही आमच्या बहिणीच्या घरामध्ये बसून औक्षण करून घेत आहोत असे आम्हाला वाटते असे मत व्यक्त केले. तेथे उपस्थित असलेले किंवा त्यांच्या बहिणीकडे औक्षण करून घेण्यासाठी जात असलेले प्रवासांना हा प्रसंग पाहून त्यांना सुद्धा भरपूर आनंद झाला.
या कार्यक्रमास सोलापूर आगाराचे डेपो मॅनेजर नागेश जाधव, प्रकाश अवस्थी, प्रशांत महाजन, प्रशांत गायकवाड, अमर यादव, छपेकर, महावीर नळे, ज्ञानेश्वर लामकानी, सोमनाथ पाटील, गोपाळ जक्का, सचिन लोंढे, महादेव पवार, उमेश बनसोडे, नंदू बनसोडे, जैन संघटनेचे विक्रांत बेशेट्टी, विजय छंचुरे, मंजुनाथ खोबरे, प्रिया पाटील, निर्मला मेहता, मंगेश शहा, मानसी शहा,श्रद्धा शहा, वर्षा जैन, दिपाली अंबुरेआदींची उपस्थिती होती.


















