श्रीपूर – माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद ऊर्फ भाऊसाहेब कुलकर्णी यांना नाशिक येथील रेड क्रॉस स्वस्तिक सोसायटी या मानवतावादी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिना निमित्त सामाजिक सेवा पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले .
मुंबईचे सह पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले
यावेळी रेड क्रॉस स्वस्तिक सोसायटीचे संस्थापक पोलिस महा संचालक डॉ . पी .एस . भाल , रेड कॉस सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कोते , स्वस्तीक इंडिया कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष राजगुरू उपस्थित होते . रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दरवर्षी आषाढी वारी मध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून वारकऱ्यां साठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवली जाते .
रेड क्रॉस स्वस्तिक सोसायटी चे वैद्यकीय पथक वारीच्या वाटेवर दरवर्षी श्रीपूर मध्ये मुक्कामी असते त्यांची भोजन , फराळ , चहा पाणी व निवासाची सोय श्रीपाद ऊर्फ भाऊसाहेब कुलकर्णी हे अव्याहत पणे गेली पंचवीस वर्षे सेवा म्हणून कार्य करतात .
भाऊसाहेब कुलकर्णी यांच्या या सामाजिककार्याची दखल घेत सदर रेड क्रॉस स्वस्तिक सोसायटीने रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधत त्यांना सन्मानित केले आहे . भाऊसाहेब कुलकर्णी यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .
भाऊसाहेब कुलकर्णी यांना मानव सेवेचा पुरस्कार देवून गौरविताना भूषणकुमार उपाध्याय .

















