सोलापूर : डॉ. हेडगेवार रक्तपेढी कडून रक्ताच्या सर्व तपासण्या करून रुग्णांना सुरक्षित रक्तपुरवठा केला जातो. असे उदगार भिम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्र हिंगमिरे यांनी रक्तपेढीच्या भेटीदरम्यान काढले. रक्तपेढीचे कार्य पाहून भिम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तपेढीस स्वेच्छा भेट दिली.
जनसंपर्क अधिकारी सुशांत कुलकर्णी यांनी रक्तपेढीच्या सर्व विभागांची व कार्याची माहिती दिली. त्यावेळी रक्तपेढीचे थॅलेसेमिया बाबतचे सेवाकार्य पाहून भिम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्र हिंगमिरे यांनी रक्तपेढीस रु पाच हजारांची देणगी दिली.
शहरात रक्ताचा तुटवडा असताना गरजेच्या वेळी डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडून गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले, त्याबद्दल भिम प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे यांनी विशेष अभिनंदन केले.
यावेळी भिम प्रतिष्ठानचे पदाधिकारी शिवाजी पवार, अकबर शेख, सिद्धांत बाबरे, सौदागर देवघन, उषा चव्हाण, कल्पना चव्हाण, हिरजचे उपसरपंच चंद्रकांत तमशेट्टी आदी उपस्थित होते. डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव मिलिंद फडके, संचालक प्रकाश कुलकर्णी, व्यवस्थापक रंगनाथ जोशी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जनसंपर्क अधिकारी रवी कोटा आणि रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी सुशांत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
























