भोकर / नांदेड – अनेकांनी नांदेडला राहून भोकर नगरपरिषदेचा नगरसेवक नगराध्यक्ष होण्याची स्वप्ने पाहत आहेत येथील मतदार अशा लोकांना नगरपरिषदेत पाठवतील का?असा प्रश्न नागरीकांना पडला असून भोकर शहरात राहणारा जनतेची कामे करणारा नगराध्यक्ष व नगरसेवकास आम्ही निवडणार असल्याचे मतदार बोलत आहेत.
भोकर नगरपरिषदेच्या निवडणूकिसाठी अनेकजण गूडघ्याला बाशिंग बांधून फिरताना दिसून येत आहेत फिक्स नगराध्यक्ष, फिक्स नगरसेवक आशा पोस्ट समाज माध्यमावर झळकत आहेत मागील काळात कोणत्या नगरसेवकांनी जनतेची कामे केली कूणाचे प्रश्न सोडविले यापूढे आपली कामे कोण करु शकतो हे देखील मतदार ओळखून आहेत अडचणीच्या काळात ह्या लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकास फोन केला तर त्यांचा कधी फोन उचलला नाही त्यांची अडचण समजून घेतली नाही अशा लोंकांनी पून्हा नगरसेवक नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहत असल्याचे निदर्शनास येत असून मतदारांनी यावेळी जो नगरसेवक पूर्ण वेळ भोकरला राहून जनतेची कामे पाहतील अशा उमेदवारांच्या पाठिशी खंबिरपणे साथ देण्याचा व त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा मतदारामध्ये होत आहे.
पक्षश्रेष्ठिनी उमेदवार देताना या सर्व बाबींचा विचार करुन प्रभागात राहणारा सामाजीक भान असलेला उच्चशिक्षित उमेदवार दिल्यास निश्चित मतदारांनी अशा उमेदवारांना साथ देतील अशी चर्चा वार्डा वार्डातील नागरीकांमध्ये होत आहे.


















