भोकरदन / नांदेड : भोकरदन नगरपालिकाचा नुकताच काल २१ रविवार रोजी निवडणूक निकाल जाहीर झाला असून, याच पार्श्वभूमीवर अवघ्या काही तास उलटून गेल्याने भाग दहा मधून निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक राजाराम सहाने यांनी मतदानाच्या काळामध्ये मतदारांना विकास कामांचा आश्वासन दिले होते , आज २२ सोमवार रोजी प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, या कामाचे उद्घाटन मा. जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
दरम्यान भाजपचे नवनिर्वाचित राजाराम सहाने यांनी मतदानाच्या काळात मतदारांना आश्वासन दिले होते की मी जर का निवडून आलो तर तुमचा सेवक म्हणून काम करणार असे आश्वासन मतदारांना दिले होते, अवघा निवडणुकीचा निकाल लागून एकच दिवस उलटला असून प्रत्यक्षात आज २क्रीडा कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कुरेशी गल्ली परिसरात पाणीटंचाईची समस्या असल्याची बाब नागरिकांनी त्यांच्या कानावर घातली होती.
नागरिकांशी दिलेला शब्द पाळत, निवडून आल्यानंतर मी स्वतः प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाणीपुरवठ्याच्या कामाला सुरुवात केली. केली असून या प्रभागामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित नगरसेवक यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने भोकरदन शहरात चर्चाला उधाण आले आहे, यावेळी कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेवक दीपक मोरे, लता शंकर सपकाळ, रामदास पाथरे अनिल उबाळे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती,
निवडणूक केवळ जिंकण्यासाठी नसून, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असते — हीच माझी ठाम भूमिका आहे.आपल्या विश्वासाला कायमच न्याय देण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन या भागातील नागरिकांना दिले आहे,
राजाराम सहाने नवनिर्वाचित नगरसेवक

























