भोकरदन : भोकरदन तालुक्यातील निमगाव येथील गणेश दगडु सौदागर वय 45 वर्ष हे निमगावहून शिर्डीला गेले होते, सदरील इसम हा बेपत्ता झाल्याची त्यांच्या नातेवाईकांनी दिनांक 27 /09/ 2023 रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती, सदरील इसम हा गेल्या दहा ते अकरा महिन्यापासून बेपत्ता होता,
सदरील इसमाचा भोकरदन पोलीसांनी शोध घेतला असता सदरील इसम श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे मिळून आला आहे, सदरील इसमास भोकरदन पोलीस ठाण्यात आणून त्यास त्याच्या नातेवाईक ताब्यात दिले आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दराडे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बमन्हावत यांनी केली आहे