तभा फ्लॅश न्यूज/नायगांव : महाराष्ट्र आर्यवैश्य समाजाच्या आध्यात्मिक सेवा भावाचा एक नवा अध्याय तिरुपती नगरीत सुरु होणार आहे. महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्यावतीने श्रीक्षेत्र तिरुपती येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य भक्त निवासाच्या बांधकामाचा शुभारंभ मान्य वरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सीता माँ ट्रस्ट, तिरुपती यांच्या सहकार्याने महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेस देण्यात आलेल्या एक एकर जागेचे रजिस्ट्रेशन नुकतेच राज्यसभेचे माजी खासदार टी.जी. व्यंकटेश यांच्या हस्ते, महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी विलासजी बच्चू, अध्यक्ष नंदकुमार गादेवार व महासचिव गोविंदराव बिडवई यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या ऐतिहासिक टप्प्यानंतर महासभेच्यावतीने. १०२ खोल्यांचे भव्य भक्त निवास उभारण्यात येणार असून. त्याचा भूमिपूजन सोहळा आता होत आहे.
या शुभ प्रसंगी वासू अध्यक्ष-काशी , अन्नपूर्णा सत्रम,विलासजी बच्चू सचिव, नंदकुमार गादेवार अध्यक्ष– महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा,डाॅ. सूर्यकांत शिरपेवार अध्यक्ष–बांधकाम समिती, या अनेक दिग्गज मान्य वरांच्या उपस्थितीत टी.जी.व्यंकटेश माजी राज्यसभा खासदार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या शिवाय महासभेच्या राज्य कार्यका रणी मंडळ, सल्लागार समिती, बांधकाम समिती, समन्वय समिती, माहिती व तंत्रज्ञान समिती, तसेच सर्व जिल्हाध्यक्ष, सचिव,कोषाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, देणगीदार, व इतर मान्यवर पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या भक्त निवासामुळे तिरुपतीस येणाऱ्या महाराष्ट्रा तील वैश्य समाजातील भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज निवासा ची उत्तम सोय उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम समाजाच्या आध्यात्मिक समर्पणाचा आणि सेवा वृत्तीचा उत्तम नमुना ठरणार असून.या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आर्यवैश्य महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई यांनी केले आहे.