मुंबई – प्रशासकीय क्षेत्रामध्ये परळीच्या भूमिपुत्राने विविध मुख्य पदांवर कर्तव्य बजावण्याचा बहुमान मिळवला असून परळीचे डॉ. विशाल राठोड यांची आता तीन वर्षासाठी कोकण विभागाच्या म्हाडाचे मुख्य अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी\ प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विशाल राठोड यांच्यावर कोकण विभागाच्या गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाची मुख्य जबाबदारी घेण्यात आली आहे. परळीसाठी ही बहुमानाची बाब असून या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
डॉ. विशाल राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत मुख्य अधिकारी, कोकण गृहनिमर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई या पदावर ३ वर्षाकरीता नियुक्ती करण्यात येत आहे.याबाबतचा शासनादेश आज निर्गमित करण्यात आला आहे.
परळीचे भूमिपुत्र असलेल्या डॉ. विशाल राठोड यांनी प्रशासनात विविध पदांवर चांगले काम केले आहे. आपल्या उल्लेखनीय कार्याचा ठसा त्यांनी प्रशासनात उमटवलेला आहे. त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कामाबद्दल त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी /प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
या अनुषंगाने राज्य शासनाने आता त्यांना तीन वर्षासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणा अंतर्गत कोकण म्हाडाचे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




















