RTE प्रवेश प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ ?
निकष पूर्ण न करणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची निवड रद्द करण्याची वंचित आघाडीची मागणी
भोकरदन : RTE प्रवेश प्रक्रिया 2024-2025 ची निवड प्रक्रिया पहिली फेरी दिनांक 22/07/2024 रोजी जाहीर करण्यात आली त्या मध्ये भोकरदन शहरामध्ये काही नामांकित शाळामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांनी चुकीच्या पद्धतीने माहिती भरून प्रवेश मिळविले असून या प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान सदरील प्रवेश प्रक्रियेची तात्काळ चौकशी करून ती यादीच रद्द करावी नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री कैलास दातखीळ शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जि प जालना यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोकरदन मधील नामांकित शाळा ज्या मध्ये 1) गुरुकुल इंग्लिश स्कूल 2) श्री गणपती इंग्लिश स्कूल 3) श्री भाऊसाहेब देशमुख स्कूल 4) पायोनीयर सीबीएसई स्कूल या शाळा मध्ये RTE प्रवेश प्रक्रिया च्या माध्यमातून प्रवेश मिळवण्या करिता काही पालक यांनी चुकीच्या पध्दतीने माहिती भरून प्रवेशास पात्र झाल्याचे दिसून येते. त्या मध्ये बऱ्याच लोकांनी त्यांचा पत्ता हा चुकीचा दाखवला आहे तर काहींनी वार्षिक उत्पन्न चुकीचे दर्शवले आहे. तर काही शासकीय कर्मचारी यांनी जात प्रवर्ग दाखऊन प्रवेशास पात्र झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. त्या मध्ये काही खालील प्रमाणे मुद्दे आहेत
1) निवड झालेल्या लाभार्थी यांची कागदपत्रे ही आपल्या कार्यालयातील सक्षम आधिकारी यांच्या मार्फत पडताळणी करण्यात यावी
2 ) तसेच ते राहत असलेल्या त्यांनी दर्शवलेल्या पत्याची गृह चौकशी करण्यात यावी तसेच भाड्याने राहत असल्यास भाडे पट्टा असल्यास तो निर्धारित दिनांका पूर्वीचा व नोंदणीकृत असावा
3) या मध्ये काही पालक ही मोठे व्यावसायिक असून करदाते आहेत त्यामुळे पालकांचे pan Card अनिवार्य करावे व त्यांच्या उत्पन्ना बाबत सत्यता तपासावी
4) या मध्ये सामाजिक आरक्षण या निकषा नुसार काही शासकीय कर्मचारी यांचे पाल्यांची निवड झाली आहे त्यांची चौकशी निवड रद्द करण्यात यावी
करीता आपणास नम्र विनंती की, भोकरदन शहरामध्ये RTE प्रवेश प्रक्रिया 2024-2025 मध्ये निकष पूर्ण न करणारे बोगस लाभार्थीची निवड झाली असून ती निवड रद्द करण्यात यावी संबधित बोगस लाभार्थी यांची चौकशी करून प्रवेश रद्द करण्यात यावी ही नम्र विनंती
अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या सर्वस्वी जबाबदारी ही आपणावर राहील असा इशाराही शेतकरी निवेदनात दिला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल मिसाळ,सचिन पारखे, नितीन जोगदंडे आदी वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते.