जालना – महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित दादा ) पक्षातील सक्षम आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार असल्याचे पक्षनिरीक्षक माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रसंगी आयोजित बैठकीत सांगितले.
जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पक्षाच्या वतीने बुधवार रोजी जिल्हा पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पक्षनिरीक्षक श्री आजबे यांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष मधुकरराव आर्दड प्रदेश सरचिटणीस रवींद्र तौर शकुंतला ताई कदम , धैर्यशील चव्हाण, शहा आलम खान, चंद्रकांत कारके , वंदना खांडेभराड , महिला जिल्हाध्यक्षा मंगलाताई पाटील,अण्णासाहेब चितेकर , प्रभाकर घेवंदे , प्रा. सोपानराव तेलगड, विठ्ठल बरकुले सतीश वाहुळे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना श्री आजबे म्हणाले की जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून पूर्ण ताकद देण्यात येईल सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन संघटनात्मक ताकद निर्माण करणे गरजेचे आहे निवडणुकीत उमेदवारांनी आपली ताकद आणि कसोशीचे प्रयत्न केल्याशिवाय गत्यंतर नाही.
जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण बोलताना म्हणाले की जालना महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन अंकी विजयी संख्या मिळणार असून आमच्या शिवाय कोणालाही महापौर करता येणार नाही श्री चव्हाण म्हणाले की महायुती आणि युती संदर्भात बोलणी सुरू आहे युती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व जागा लढण्याची तयारी ठेवली आहे. *मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर मधुकरराव आर्दड*
प्रदेश उपाध्यक्ष मधुकरराव आर्दड बोलताना म्हणाले की मराठवाड्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे , महापालिकेच्या निवडणुकीत नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकी समोर गेल्यास निश्चितपणे मोठे यश मिळेल असे श्री आर्दड यांनी सांगितले.
मिरवणूकीने वाजत गाजत इच्छुक उमेदवार पक्ष कार्यालयात पोहचल्याने यावेळी इच्छुकांची मोठी गर्दी उफाळून आली होती , मुलाखती दरम्यान एका सिव्हिल इंजिनिअर कु. सांची म्हस्के प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारीची मुलाखत दिली तर निर्मलाबाई सले या अपंग महिलेने प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखत दिली हे विशेष होय.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शेख. महेमूद यांनी सांगितले शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणे उभा राहात आहे 16 प्रभागातील 65 जागेवर पक्षाने निवडणुकीची तयारी केली आहे,
यावेळी पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या आहेत .

























