सोलापूर – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीने (एनडीए) एकहाती सत्ता मिळवत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर मोडनिंब (ता. माढा) शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी दत्त चौकात जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली.भारत माता की जय, वंदे मातरम, भाजपाचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.फटाक्याची आतषबाजी करून, पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत मोठा विजय मिळवला.
या विजयामुळे देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या धोरणांवर जनतेने विश्वास दर्शवल्याची भावना यावेळी भाजपा शहराध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली. या ऐतिहासिक विजयानंतर मोडनिंब शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांसह जोशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सुर्वे, सरचिटणीस धनाजी लादे, तालुका उपाध्यक्ष नितीन सुर्वे, कैलास तोडकरी, संतोष पाटील, मोडनिंब शहराध्यक्ष राहुल गांधी, शहर सरचिटणीस अमोल काटकर, सुनील पंडित, अनुसूचित जाती शहराध्यक्ष प्रमोद गाडे, ओबीसी सेल शहराध्यक्ष संपत महामुनी, किसान मोर्चा शहराध्यक्ष लखन पाटील, वैभव पाटील, संजय शेळके,ज्ञानेश्वर लादे, रोहन शिंदे आदी उपस्थित होते.


















