माहूर / नांदेड – भाजपाचे माहूर शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू भाऊ महामुने यांच्या वैविध्यपूर्ण विशिष्ट प्रासंगिक इव्हेंटची आकर्षक आणि बोलक्या क्षणचित्रातून माहिती दर्शविणाऱ्या सन २०२६ या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता आनंद फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. खरेदी केंद्र, उमरा येथे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तथा विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी तथा प्रतिष्ठीत नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, नगरसेवक राजेंद्र केशवे, कृ.उ.बा.समिती सभापती दत्तराव मोहिते, मधुकर लोळगे, माजी पं.स. सभापती मारोती रेकुलवार, हाजी उस्मान खान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंचकराव देशमुख,अमजद खान, काँग्रेसचे नेते किसन राठोड, जयस्वाल सेठ सारखणी, गंधे सर सारखणी,किशोर जगत,
विनायकराव देशमुख,भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल वाघमारे, विजय आमले, नंदकुमार जोशी,वसंतराव कपाटे, माजी जि.प.सदस्य संजय राठोड, विष्णू काका पडलवार, संजय बनसोडे, मनीष भाऊ राठोड, दत्तात्रय शेरेकर,शाम कुमरे सर यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

















