सोलापूर – भारतातील सर्वात जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेसला भारतातून हद्दपार करण्यासाठी भाजपने चंग बांधला होता. काँग्रेस मुक्त भारत अशा घोषणा देणाऱ्या भाजपला आज काँग्रेस युक्त भाजप करावी लागत आहे. महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांकडे उमेदवाराचे नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्षातील उमेदवार साम-दाम-दंड-भेद वापरून चोरले जात आहेत. “इतके दिवस फक्त वोट चोरी होत होती आता लोक चोरी” होत आहे. या नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी तोंडावर आपटले आहे. त्यांच्यासोबत असणारे दोन कुबड्यांनी मात्र सत्ता काबीज केली आहे. यंत्रणेचा वापर करून देखील भाजपला म्हणावे तितके यश प्राप्त करता आले नाही. अशी टीका खा. प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात केली.
दरम्यान, सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी त्या सोलापुरात आल्या होत्या. मुलाखती संपन्न झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाची संवाद साधला. पुढे त्या म्हणाल्या जेव्हापासून भाजप सत्तेत आले आहे. तेव्हापासून या सगळ्या गोष्टी घडत आहेत. इतके दिवस मॅन मशिनरी आणि मनीच्या साह्याने वोट चोरी केली जात होती. आता उघडपणे लोक चोरी होत आहेत. इतर पक्षांचे उमेदवारच चोरले जात आहेत. त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार शिल्लक नाहीत. यागोष्टीची कीव करावी वाटते. पैशाचे आम्हीच दाखवून सत्ता काबीज केली जाते. ही खूप लाजराने गोष्ट आहे. जे लोक पक्ष सोडून गेले आहेत त्यांची काय अवस्था आहे, हे तुम्हाला माहित आहे मी सांगण्याची गरज नाही. या नगरपालिकेच्या निवडणुकीत हे चित्र सर्वांना दिसले आहे. असे देखील त्या यावेळी म्हणल्या.
















