तभा फ्लॅश न्यूज : हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक मंडळाकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये राजाबाजार/कैलासनगर भाजपा मंडळात काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झालेले ना. अतुल सावे (कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य), भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किशोरदादा शितोळे, यांनी रॅलीला संबोधित केले.
या तिरंगा रॅलीला संबोधित करताना भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किशोरदादा शितोळे म्हणाले की, इंग्रजांच्या जुलमी राजवटीत शेतकऱ्यांवर, गोरगरीब जनतेवर अनन्वित अत्याचार होत होते. जबरदस्तीने शेतसारा वसूल करण्यात येत होता. मिठावर कर लादण्यात येत होता… अशा परिस्थितीत भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी, देशात मोठ्या चळवळींनी जोर धरला, ज्यात महात्मा गांधींनी “चले जाव”चा नारा देत या चळवळीचे नेतृत्व केले.
दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, वीर भगतसिंग यांनीही इंग्रज राजवटीविरुद्ध भारतीयांमध्ये असंतोष जागृत केला.
पुढे बोलताना किशोरदादा शितोळे म्हणाले की, अनेक क्रांतिवीरांनी बलिदान देऊन मिळालेले हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचा, स्वातंत्र्याचा सन्मान करण्यासाठी… पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागील चार वर्षांपासून तिरंगा रॅलीची सुरुवात केली.
या रॅलीचा उद्देश सांगताना ते म्हणाले की, आज देशहिताच्या, जनहिताच्या निर्णयांवर देखील काही नतदृष्ट लोक विनाकारण राजकारण करताना दिसत आहेत… असे देशद्रोही राजकारण होऊ नये म्हणून ही तिरंगा रॅली दरवर्षी आयोजित करण्यात येते.
या रॅलीमध्य भाजपा सरचिटणीस रामेश्वर भादवे, ताराचंद गायकवाड, भाजपा मंडळ अध्यक्ष, निखिल महाले, भाजपा उपाध्यक्ष, शिवाजीराव दांडगे, भाजपा रॅली संयोजक आणि उपाध्यक्ष, महेश माळवदकर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष उज्वलाताई दहीफळे,सचिव सिद्धार्थ साळवे, सुप्रियाताई चव्हाण, सखाराम पोळ, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते श्री. चंद्रकांत हिवराळे, यांच्यासह मंडळातील पदाधिकारी, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.