तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव : जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद मेळावा आयोजित केला होता. यावेळी वाशी तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्या बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रमाच्या तालुका प्रमुख सौ.उज्वला आनंद पाटील यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याकडे बोरी ते चव्हाण वस्तीशेत रस्ता साठी दहा लक्ष बोरी ते पाटील वस्ती शेत रस्ता साठी दहा लक्ष बोरी ते शिंदे वस्ती शेत रस्त्यासाठी बारा लक्ष असे एकूण बत्तीस लक्ष रुपयाची कामे मंजूर करण्यासाठी दत्ताभाऊ कुलकर्णी भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्यामार्फत चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले.
सदरील निवेदनाचा विचार होऊन त्वरित बोरी तालुका वाशी येथील शेत रस्त्याची कामे चालू होतील त्यामुळे बोरी नागरिकांची कायमची रस्त्याची सोय होणार आहे. यासाठी उज्वला पाटील या सतत गावातील अनेक कामे घेऊन जातात. बोरी गाव हे आदर्श गाव कसे होईल. यासाठी प्रयत्न शील असतात, व त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्षांचा हमेशा सहकार्य मिळत आहे. त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करत आहेत.