तभा फ्लॅश न्यूज/वाशी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आप्पा आखाडे पारगाव व वाशी तालुका महिला बेटी बचाव अध्यक्षा उज्वला पाटील यांनी वाशी येथील तहसीलदार मेत्रे साहेबांना निवेदन दिले. त्यांनी वाशी तालुक्यातील सोयाबीन,उडीद,मुग, तुर ही संपूर्ण पिके नष्ट झाली असून त्या पिकात अद्याप पर्यंत पाणी साचले आहे.
तसेच भाजीपाला व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी वाशी तालुक्यातील सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे.