तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मुंबई भाजपतर्फे 350 एसटी बस आणि ट्रेनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवारी मुंबई भाजप अध्यक्ष व राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड् आशिष शेलार यांनी एसटीला भगवा झेंडा दाखवून या सेवेचा प्रारंभ केला.
मुंबईच्या विविध भागातून या गाड्या कोकणाकडे रवाना होणार आहेत. बीकेसी मध्ये या गाड्यांचा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून आज या ठिकाणी नारळ वाढवून या सेवेची सुरवात करण्यात आला. यावेळी आमदार संजय उपाध्याय, सुहास आडिवरेकर, कमलाकर दळवी, जितेंद्र राऊत आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 25 तारखेला एक स्वतंत्र ट्रेन कोकणात रवाना होणार आहे.